Surprise Me!

कंगनाच्या बहिणीने साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा | Kangana's sister Rangoli on CM Uddhav Thackeray

2021-08-24 0 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल आणि वाद यांचे जवळचे नाते आहे. ट्विटरवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली रंगोली तिच्या ट्विटद्वारे अनेकदा वाद ओढवून घेते. अनेकदा ट्रोल होते. पण कुणाला जुमानेल ती रंगोली कसली. आता रंगोलीने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. काही तासांपूर्वी रंगोलीने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगीजींकडून गंभीर धडा देण्याची गरज आहे,' असे ट्विट रंगोलीने केले आणि तिचे हे ट्विट बघता बघता क्षणात व्हायरल झाले.
हे ट्विट करताना तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कार्यांचा पाढाही वाचला. होय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता हॉटेलमध्ये 10000 खोल्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये देखील 10000 खोल्या करोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार ठेवल्या आहेत, अशी योगींच्या कार्याची महती सांगणारी एका वेब पोर्टलची बातमी या ट्विटसोबत तिने जोडली आणि याच निमित्ताने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

#LokmatNews #KanganaRanaut #RangoliChandel #UddhavThackeray
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon